नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी ठाकरे गटाला अल्प प्रमाणात दिलासा दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेले ’उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल चिन्ह तुर्तास कायम राहणार आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
या प्रकरणावर आज सुनावणी झाली या सुनावणी. यात निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटाला देण्यात आलेले नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह कायम राहणार आहे. यामुळे ठाकरे गटाला अल्प प्रमाणात का होईना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.