‘त्या’ ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये वाळू नाहीतर होती माती : महसूल पथकाचा खुलासा

 

रावेर, प्रतीनिधी ।  महसूल पथकाने अवैध वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली  दि. १० फेब्रुवारी रोजी जप्त केले होते व तहसिल कार्यालयात नेऊन दंड न करता सोडुन दिल्या प्रकरणी प्रांतधिकारी कार्यालयात दिलेल्या खुलास्यांमध्ये ट्रक्टर-ट्रॉलीमध्ये वाळु नव्हे तर माती असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

या बाबत वृत्त असे की, रावेर महसूल पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रक्टर-ट्रॉली दि. १० रोजी फेब्रुवारी रोजी शहरातील आठवडे बाजार येथे पकडले होते.  संशयित ट्रक्टरद्वारे वाळूची अवैध वाहतूक होत होती म्हणून येथील तहसील कार्यलयात जप्त देखील केले होते. परंतु थोड्या वेळाने ते सोडुन देण्यात आले होते. याप्रकरणी प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी रावेरच्या त्या महसूल पथकाकडून लेखी खुलासे मागवीले होते.  महसूल पथकाने लेखी सुलासे सादर केले असून त्यात वाळू नव्हे तर माती असल्याचे खुलास्यामध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी पथकाला कडक ताकीद दिली असून चौकशी सुरु असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला सांगितले.

 

Protected Content