‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जातवैधना प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे तालुक्यात मागील झालेल्या सन २०२१च्या सार्वत्रीक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागावर विविध पदावर निवडुन आलेले लोकप्रतिनिधी हे अपात्र होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्यातील सन२०२१च्या कालावधीत पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणुन निवडुन आलेले तालुक्यातील सुमारे ६२ ग्रामपंचायत सदस्यांना आपले पद गमवावे लागणार आहे.

 

या निवडणुकीत अनुसुचित जमातीसाठी च्या राखीव असलेल्या जागेवर ग्राम पंचायत सदस्य म्हणुन निवडून आलेल्या सर्व सदस्यांना आपले जात वैधता पडताडणीचे प्रमाणपत्र दिनांक १७ जानेवारी २०२३पर्यंत सादर करण्याचे होते . दरम्यान यावल तालुक्यातील आदीवासी समाजाचे सामाजीक कार्यकर्ते जुम्मा तडवी  यांनी दिनांक २१ / ११ / २०२२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे निवडणुकी झाल्यानंतर मुदतीच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी तक्रार निवेदनाव्दारे केली होती.

 

जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यावल तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या प्रर्वगातुन राखीव जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांची यादी मागविण्यात आली असुन, यावल तालुक्यातीत विविध ग्रामपंचायतच्या निवडुणुकीत राखीव जागेवर विजयी झालेले सुमारे ६२ ग्रामपंचायत सदस्य हे अपात्र होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.  दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही सर्व अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर निवडुन आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांच्या अपात्रते संदर्भात त्वरीत निर्णय न झाल्यास आदीवासी चळवळीच्या विविध सामाजीक संघटनेंच्या माध्यमातुन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.

Protected Content