‘त्या’ उड्डाणपुलाला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव द्या : शिंपी समाजाची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलाला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिंपी समाजाच्या वतीने महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देवून केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुजराल पेट्रोल पंपाजवळील राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल नुकताच तयार झाला आहे. त्या  उड्डाणपुलाला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव देण्यात यावे, कारण यावर्षी श्री संत नामदेव महाराज यांचे ७५१ वी जयंती वर्ष आहे. याचे औचित्य साधून वरील कार्य झालास समर्पक प्रतिसाद झाल्यासारखे वाटेल. तसेच या परिसरात शिंपी समाजाचे ४०० हून अधिक कुटुंबांचा रहिवास आहे. दरवर्षी संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी व जयंती कार्यक्रम या भागात मोठ्या प्रमाणावर होत असतो. ही  शिंपी समाजाची ही मागणी बऱ्याच वर्षांपासून आहे. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ वी जयंती असून त्या दिवशी नामकरण सोहळा झाला तर हा ऐतिहासिक क्षण असेल. या मागणीसाठी महापालिकेच्या सभेत हा ठराव मंजूर करावा अशी मागणी शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील  यांच्याकडे देण्यात आले आहे. या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष डी. आर. शिंपी, अध्यक्ष शैलेंद्र मांडगे, उपाध्यक्ष किशोर सोनवणे, सचिव दिनेश बाविस्कर, कार्याध्यक्ष प्रविण बाविस्कर, कोषाध्यक्ष मोहन खैरनार, शिवदास साबळे, तुळशीदास निकुंभ, संजय अहिरराव, किशोर शिंपी, राजेंद्र सोनवणे,  जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपाध्यक्ष विवेक सचिव चंद्रकांत जगताप, प्रिंपाळा शिंपी उपाध्यक्ष  ऋषिकेश कापुरे,  जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कापुरे अ. भा. शिंपी समाज उपाध्यक्ष मुकुंदराव मेटकर,  मा. अ. भा.  युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, गणेश मेटकर. सुरेश सोनवणे, अनिल खैरनार, प्रविण कापुरे,  दादावाडी  परिसर अध्यक्ष शैलेंद्र मांडगे, शिवदास आबा सावळे  यांनी दिले व या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

Protected Content