‘त्या’ आशा स्वयंसेविकांना नियुक्तीपत्र द्या ; नगरसेवक महेश चौधरी यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरात कोरोनाचा वाढता जोर पाहता आरोग्य विभागात आशा स्वयंसेवकांची संख्या खूपच कमी असून त्यांची भरती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावी अशी मागणी भाजपा नगरसेवक महेश चौधारी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यात आशा स्वयंसेविका यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने शहरात जनजागृती करण्यात विलंब होत आहे. दरम्यान, आशा स्वयंसेविकांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून आशा स्वयंसेवकांची निवड झाल्याचे समजते. काही तांत्रिक कारणास्तव त्यांना नियुक्तीपत्र दिले नसल्याचे समजते. तरी आपण तांत्रिक अडचणी दूर करून त्या निवड करण्यात आलेल्या आशा स्वयंसेविका यांना नियुक्तीपत्र देऊन तात्काळ सेवाकार्यात घ्यावे. तसेच डॉक्टर, नर्स, आशा स्वयंसेविका व आरोग्य विभाग यातील सर्व कर्मचारी दिवस-रात्र आपला जीव धोक्यात घालून शहरात कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे त्यांचा लवकरात लवकर विमा उतरविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक महेश चौधारी केली आहे.

Protected Content