Home Cities जळगाव ‘तो’ मार्ग पूर्ववत सुरु करा : अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

‘तो’ मार्ग पूर्ववत सुरु करा : अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

0
34

जळगाव, प्रतिनिधी । खान्देश मिल कॉम्प्लेक्स बिग बाजार परिसरातून रेल्वे स्टेशनकडे जाणारा बंद केलेला मार्ग पूर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अश्विनी देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

 

निवेदनाचा आशय असा की,  जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप व नेहरु चौक येथून रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्ग “राजमुद्रा” या कथित मालकाने बंद केला असून तो पूर्ववत सुरु करण्यात यावा. सदर कथीत व वादग्रस्त मालकाने मनपाकडून NA व बांधकाम परवानगी गेल्या चार वर्षापासून मिळवली आहे. NA व बांधकाम परवानगी मिळाल्याने सदर जागा रस्ता मनपा मालकीची व ताब्यात आली असल्याने मालकाने रस्ता बंद करणे, तेथे गेट उभारून वॉचमन ठेवणे व रहदारीस मनाई करणे नियमबाह्य आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून तेथे बसविण्यात आलेले गेट मनपाने काढून टाकून रस्ता रहदारीस मोकळा व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना डॉ. अश्विनी देशमुख यांच्यासह  राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रतिभा शिरसाठ, अॅॅड. विजय भास्करराव पाटील, दिलीप शेवाळे, मिलिंद सोनवणे, आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound