जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पसिरातील जळगाव तोलकाट्याजवळ असलेल्या कुंपनात उभी दुचाकी लांबविल्याप्रकरणी मंगळवार, २४ जानेवारी दुपारी पावणे पाचवाजेच्या सुमारास रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे किरण धनराज अत्तरदे हे वास्तव्यास आहेत. २२ जानेवारी रोजी किरण अत्तरदे हे दुचाकीने जळगाव तोलकाटा पसिरात आले होते, यादरम्यान त्यांनी त्यांची एम.एच. १९ .बी.डब्लू ७३०४ या क्रमाकांची दुचाकी जळगाव तोलकाट्याजवळ असलेल्या कुंपनात उभी केली होती. काम आटोपून परतल्यावर दुसऱ्या दिवशी २३ जानेवारी रोजी दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने किरण अत्तरदे यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहेत.