तृप्ती देसाई यांना जीवे ठार मारण्याची धमकी !

indurikar and trupti desai

पुणे (वृत्तसंस्था) तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाहीस तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो, अशी धमकी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना वारकरी संप्रदायाच्या सोमनाथ महाराज भोर यांनी फोनवरुन दिली. या संदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलिस स्थानकात देसाई यांनी मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

 

याबाबत माहिती देतांना तृप्ती देसाई यांनी सांगीतले की, किर्तनातून महिलाचा वारंवार अपमान करणारे इंदुरीकर महाराज यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत आहे. शुक्रवारी सकाळी राहत्या घरी धनकवडी पुणे येथे असताना मला एक फोन आला. मोरुन मी सोमनाथ महाराज भोर, अकोले तालुक्यातून बोलत आहे, असे सांगण्यात आले. त्याने मी तृप्ती देसाईच असल्याची खात्री झाल्यानंतर शिवीगाळ करायला सुरूवात केली. अगदी त्यात तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाहीस तर तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो अशी धमकी देण्यात आली.

Protected Content