तुम्ही सांगाल त्याठिकाणी येतो, मला गोळ्या घालून दाखवा ; ओवेसींचे ठाकूर यांना आव्हान

asaduddin owaisi

 

मुंबई (वृत्तसंस्था) मी अनुराग ठाकूर सांगतील, त्याठिकाणी यायला तयार आहे. त्याठिकाणी तुम्ही मला गोळ्या घालून दाखवाच, असे थेट आव्हान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्या गोळ्या घाला वक्तव्यावर दिले आहे. नागपाडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले की, मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचे नाव सांगावे जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे. मच्या वक्तव्याने माझ्या मनात किंचीतशीही भीती निर्माण झालेली नाही. कारण आमच्या माता-भगिनी देशाला वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत, असे ओवेसी यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपकडून ओवेसी यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो *** को’ अशी वादग्रस्त घोषणा दिली होती.

Protected Content