तीन शेतकऱ्यांच्या शेतातून सामानांची चोरी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारातून तीन शेतकऱ्यांच्या शेतातून ५ क्विंटल कापूस ठिबक सिंचनच्या नळ्या, पाण्याची मोटर आणि पाण्याची मशीन असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी चोरून केला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील चहार्डी रहिवासी वंदना कैलास पाटील तसेच हर्षल प्रकाश पाटील आणि रवींद्र रमेश पाटील यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी २० नोव्हेंबर ते ३१ नोव्हेंबर दरम्यान ५ क्विंटल कापूस, १३ ठिबक सिंचन नळ्यांचे बंडल, १० हजार रुपये किंमतीची पाण्याची जलपरी आणि पाण्याची मशीन असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शेतातून चोरून येण्याचे समोर आले. या संदर्भात तीनही शेतकऱ्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक मधुकर पवार करीत आहे.

 

Protected Content