Home क्राईम तालुक्यातील विटनेर येथे दोन तरुणांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

तालुक्यातील विटनेर येथे दोन तरुणांचा पाझर तलावात बुडून मृत्यू


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथे दोन तरुणांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी ज्ञानेश्वर दगडू ढमाले (वय 28) हे शेतामध्ये काम केल्यानंतर फवारणी झाल्यावर हात पाय धुण्यासाठी पाझर तलावांजवळ गेले असताना तलावात शेतकरी योगेश ज्ञानेश्वर वराडे (वय-19) हा पाण्यात पडून बुडत असताना दिसला. योगेशला वाचवण्यासाठी शेतकरी ज्ञानेश्वर हा गेला असता दोन्ही शेतकरी हे पाझर तलावात बुडून मृत्यू झाला.   घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिवदास चौधरी, सचिन देशमुख व विटनेरचे पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी गावकऱ्यांच्या मदतीने बुडालेल्या लोकांची मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मयत तरुणांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Previous articleउड्डाण पुलावरून कोसळला ट्रक
Next articleईद घरीच साजरी करण्याचे आवाहन
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound