चाळीसगाव प्रतिनिधी । नातेवाईकांकडे लग्न असल्याने गावातील नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन बहिणीपैकी एकीचा पाण्यात पोहतांना बुडाली. पाण्यात बुडालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे सुरू आहे. ही घटना तालुक्यातील बहाळ येथे आज सकाळी १० वाजेसुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, पूनम उखा खैरनार (वय-१३) रा. पाचोरा ह.मु. पनवेल असे मयत मुलीचे नाव आहे. आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने ती मनवेल येथे मावशीकडे राहते. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने ती लग्नासाठी आली होती. लग्नात पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील तिच्या मावस बहिणी खुशी चंद्रकांत सौदागार १३, मनिषा चंद्रकांत सौदागर ११ या दोघीही आलेल्या होत्या. बहाळ गावाजवळच नदी असल्याने तीघी मुली शुक्रवारी सायंकाळी आंघोळ करण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. आज शनिवारी सकाळी पुन्हा तिनही बहिणी पोहण्यासाठी गेल्या. तिघेजण आंघोळ करतांना नदीतील डोहाचा अंदाज न आल्याने पुनम पाण्यात पडली. तर खूशी आणि मनिषा ह्या देखील बुडत होत्या. दोघेजण बुडत असल्याचे पाहून जवळून जाणारा तरूण गणेश अशोक भोई यांने तातडीने नदीत उडी घेवून खूश आणि मनिषा यांना सुखरूप बाहेर काढले मात्र पुनम पाण्यात बुडाली. आज सायंकाळपर्यंत मुलीचा शोधघेणे सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत .