Home क्राईम तालुक्यातील कुसुंबा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

तालुक्यातील कुसुंबा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता झाली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा येथे राहणाऱ्या पुष्पा वासुदेव शिंदे (वय-३५) यांच्याकडे राहत असलेली अल्पवयीन मुलगी काजल गोपाल मोरे (१५) ही काल शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाहेर जावून येते असे सांगून घराबाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. अल्पवयीन मुलगी काजल मिळून आली नाही. पुष्पा शिंदे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे करीत आहे.


Protected Content

Play sound