तामिळनाडूची संस्कृती , भाषा व लोकांचा आदर मोदी करीत नाहीत — राहुल गांधी

कोईम्बतूर ( तामिळनाडू ) : वृत्तसंस्था । “पंतप्रधान नरेंद मोदी यांना तामिळनाडुची संस्कृती, भाषा आणि लोकांचा काहीच आदर नाही. त्याचं असं मत आहे की, तामिळनाडुतील लोक, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोईम्बतूरमध्ये पोहचले आहेत. तामिळनाडुमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसयीय दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी प्रचाराची सुरूवात करतेवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

 

यावेळी राहुल गांधी म्हणाले, न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामीळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे.

राहुल गांधी तीन दिवस पश्चिम तामिळनाडूमध्ये प्रचार करतील. या दरम्यान ते तिरुपूर, इरोड आणि करूरसह पाच जिल्ह्यांमध्ये प्रचार करतील. या जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेचा विशेष प्रभाव असल्याचं मानलं जातं. राज्यातील दोन दिग्गज नेते जयललिता व करुणानिधी यांच्या निधनानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत डीएमके व काँग्रेस आघाडीने ३९ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या.

Protected Content