पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील तामसवाडी परीसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारू विक्री होत असतांना पारोळा पोलीसांनी कारवाई करत हजारो लिटर देशी दारू व कच्चे पक्के रसायन नष्ट करण्यात आले आहे.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गावठी दारु पाडली जात आहे. दारु पिण्यासाठी परिसरातील तळीराम पायदळी येत होते. तर काही ठिकाणी दारु हव्या त्या ठिकाणी पोहोचवली जात होती. याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने पारोळा पोलिसानी केली कारवाई. गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी हजारो लिटर दारु फेकून दिली तर मोठ्या प्रमाणात रसायन नष्ट करण्यात आले. मात्र राज्य उत्पादन शुल्क (दारू बंदी) विभागाकडून पारोळा तालुक्यात आतापर्यंत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये व महिलांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. पोलिस प्रशासनावर लोकडाऊनमुळे जास्त भार असल्यामुळे ते कुठे कुठे लक्ष देणार हे खरं आहे असे महिलांमधून बोलले जात होते.
तालुक्यात अनेक ठिकाणी डुबलीकेट देशी, टॅंगो, वेगवेगळ्या प्रकारची दारू व ताडी दारू दुकानाच्या पाठीमागे तांदुळाच्या पाण्यात झोपेच्या गोळ्या टाकलेली नकली ताडी सर्रास विक्री होत आहे. नागरिकांना जास्त कमी झाल्यास याला कोण जबाबदार. मात्र अमळनेर येथील राज्य उत्पादक शुल्क अर्थात दारू बंदी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची आरोड नागरीकांकडून होत आहे.
यांनी केली कारवाई
तामसवाडी येथील ही कारवाई पारोळा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र बागुल, कॉन्स्टेबल मोमीन खान, हवालदार नंदलाल कोळी तसेच मुंदाणे चे पोलिस पाटील, अशोक पाटील, शिवरेचे पोलिस पाटील, तुकाराम पाटील, देवगावचे पोलिस पाटील, विश्वास शिंदे, तरवाडेचे पोलिस पाटील राजपाल चौधरी आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.