Home क्राईम तापी पात्रात आढळला व्यापार्‍याचा मृतदेह

तापी पात्रात आढळला व्यापार्‍याचा मृतदेह

0
26

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीच्या पात्रात भुसावळ येथील व्यापार्‍याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील राहणारे रवि प्रकाशाला मुलचंदाणी या तरूणाचा मृतदेह अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात रविवारी दुपारी आढळून आला आहे. याबाबतची यावल पोलीस स्टेशनला या घटनेसंदर्भात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. सदर मयताचे येथील ग्रामीण रुग्नालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी. एल. पवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या तरूणाचा मृत्यु हा आत्महत्या की घातपात याबाबत आप्तांनी संशय व्यक्त केला आहे. कारण ते कालपासून बेपत्ता झाले होते. यानंतर आज दुपारी त्यांचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पो. नि. अरूण धनवडे यांच्या माार्गदर्शनाखाली स फौ. नेताजी वंजारी पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound