ताज हॉटेलला बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी ; पाकिस्तानातून आला फोन

मुंबई (प्रतिनिधी) पाकिस्तानमधील कराची येथून फोनवरून ताज हॉटेल बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर ताज हॉटेलच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

पाकिस्तानमधील कराची येथून ताज हॉटेल बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर ताज हॉटेलसह परिसरातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. पोलिसांनी फोन आला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, सोबतच ताज हॉटेल समुद्राला लागून असल्याने समुद्रात गस्त वाढवण्यात आली असून लक्ष ठेवले जात आहे.

Protected Content