जळगाव प्रतिनिधी । घरात कोणीही नसतांना ५० वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख जफार शेख (वय-50) रा. तांबापुरा जळगाव असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक कारणावरून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत शेख जफार शेख करीम यांना दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा प्रकार सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, असीम तडवी, मुदस्सर काजी, इम्रान सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.