जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस स्टेशन, जितो जळगाव आणि महाविर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यामानाने तांबापुरा परीसरात गोरगरीब व गरजुंना जीवनाश्यक वस्तूंचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्याहस्ते वाटप केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
यावेळी महावीर ज्वेलर्सचे अजय ललवाणी, उपपोलीस निरीक्षक गणेश कोळी, स.फौ. रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, दर्शन टाटीया, तेजस कावडीया, सुभाष लोढा, प्रविण छाजेड , प्रविण माढोळे, अशोक सनगत, नितीन पाटील, संजय भोई, महिला पोलीस कर्मचारी मालती वाडिले, आशा पांचाळ आदी उपास्थित होते. यावेळी कीराणा साहित्याचे ३५ कीटचे वाटप करण्यात आले होते. या किराणा साहित्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल, साखर, चहा, मसाले आदी जीवनावश्यक वस्तूंचा यात समावेश होता.