Home क्राईम तांदलवाडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

तांदलवाडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण


रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तांदलवाडी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

निंभोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असतांना गावातील आशिश सुनिल कोळी याने काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोठेही आढळून आले नाही. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आशिश कोळी याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound