यावल प्रतिनिधी । यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याशी अरेरावी करणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी नवनियुक्त तहसीलदार महेश पवार यांना दिले.
यावल तहसीलचे नुकतेच पदभार स्विकारलेले तहसीलदार महेश पवार यांची यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी त्यांची भेट घेवुन त्यांचे पुष्पगुच्छे देवुन स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. औपचारीक स्वागताच्या निमित्ताने झालेल्या भेटीत यावल तालुक्यातील विविध विषयावर चर्चा झाली. यात कोरोना विषाणु संसर्गाच्या सद्य परिस्थिती बाबत चा एकंदरीत चर्चे व्दारे माहीती घेवुन आढावा तहसीलदारांनी जाणुन घेतला, त्याचबरोबर तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्याशी वाद घालणाऱ्या पुंडलीक बारी यास अद्याप पोलीसांनी अटक का केली नाही या बाबत पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्याशी माहिती घेतली. या संदर्भात पोलीस ही आरोपीच्या शोध मार्गावर असुन आरोपीस निश्चित अटक करू असे सकारात्मक उत्तर पोलीस निरिक्षकांनी दिले , याशिवाय शेतकरी आत्महत्या प्रकरणा संदर्भात विविध अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तपासकामात परिपुर्ण माहीतीचा आभाव दिसुन येत असल्याने प्रशासना सखौल चौकशी अंती शेतकरी आत्महत्याचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवावे जेणे करू खऱ्या अन्नदातावर अन्याय होणार नाही या विषयावर सविस्तर चर्चा दोघ अधिकारी यांच्यात झाली .