पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) तहसीलदार यांच्या बदलीवरून खेड तालुक्यात आमदार विरुद्ध तहसिलदार यांची लढाई आता विकोपाला गेला आहे. ‘तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मला पोलीस प्रवृत्तीमिळावे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलीस स्टेशनला समक्ष येऊन लेखी तक्रार केली आहे.
पुण्यातील खेड तहसीलदारांची बदली होत नसल्याने सत्ताधारी आमदार दिलीप मोहिते हे चांगलेच हतबल झाले आहेत. पालकमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आणि विधानसभेत लक्षवेधी सूचना देऊनही आमदार मोहितेंना दाद मिळाली नाही. पण आता त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार सुचित्रा आमलेंच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची तक्रार दिली आहे. मात्र माझी बदली होत नसल्यानेच अशी तक्रार दिल्याचा दावा तहसीलदार आमले यांनी केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर एका बदलीसाठी अशी वेळ आल्याचे बोलले जातं आहे. तर तहसीलदार सुचिता दामले यांचा एकूणच कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. खेडमध्ये बदलीसाठी झालेल्या लॉबिंगपासून ते भामा, भिमा, इंद्रायणी नदीत होत असलेले अवैद्य उत्खनन माजी आमदारांनी देखील तहसीलदार आणि त्यांच्या कार्यालयाच्या विरोधात तीन लक्षवेधी विधानसभेतील सभागृहात मांडल्या होत्या. गुळाणी येथील एका शेतकऱ्यांने तहसीलदारांच्या समोर त्यांच्या केबिनमध्ये आत्महत्या केली होती.