चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव शेत शिवारातून दोन जणांचे ३ बैल अज्ञात इसमाने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील तळेगाव येथील वसंत पांडुरंग पाटील (वय-६१) व साक्षीदार धारासिंग गुलाब चव्हाण यांच्या तळेगाव शेत शिवारात बांधलेले ३ तीन बैल अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते ५ वाजेदरम्यान उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वसंत पांडुरंग पाटील यांनी बैलांची परिसरात शोधाशोध केली असता आजपावेतो मिळून आले नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून फिर्याद दाखल केली. यानुसार भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना नितीन अमोदकर हे करीत आहेत.