Home क्राईम तळीरामांनी फोडले वाईन शॉप ; दारूसह बियरचे बॉक्स लंपास

तळीरामांनी फोडले वाईन शॉप ; दारूसह बियरचे बॉक्स लंपास


सांगली (वृत्तसंस्था) सांगली जिल्ह्यातील मिरज येथे काही तळीरामांनी एक वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास केले आहेत. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे वाईन शॉप फोडल्याने शहरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

सांगली जिल्ह्यातील मिरज एस टी स्टँड परिसरात संगम वाईन शॉपचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकान फोडून दारु आणि बियरचे बॉक्स लंपास केले. विशेष म्हणजे चोरीची घटना घडली तेव्हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे पोलिसांना चोरीबाबत काही वेगळ्या शंका देखील आहेत. या घटनेनंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.


Protected Content

Play sound