नवी मुंबई (वृत्तसंस्था) मध्यंतरी शरद पवार यांनी एक विधान केले होते की, सीएएमुळे भटक्या-विमुक्तांना त्रास होणार आहे. त्यामुळे मी विरोधकांना चॅलेंज करतो की, सीएएमुळे भटक्या-विमुक्तांना कुठला त्रास होणार? हे दाखवून द्यावं जर तुम्हाला तर ते सिद्ध करता येणार नसेल तर तुम्ही मोदींची माफी मागावी, अशा शब्दात माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, खोटं बोल पण रेटून बोल, जवाहरलाला नेहरु यांनी लियाकतसोबत करार केला होता की, जर पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि जैन धर्मियांवर जर अत्याचार झाला त्यांना आम्ही भारतात घेऊ. पण अनेकजण चुकीची माहिती पसरवत आहेत. काही पक्ष सत्तेत येण्यासाठी तेढ निर्माण करतात. ते सत्तेविना राहू शकत नाहीत. मोठे मोठे लोकं सत्त्तेसाठी खोटे बोलतात. शरद पवारांना सीएएवर सर्व काही माहिती आहे. लोकांना कन्फ्युज करा, त्यांची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी मोदींची माफी मागा, देशाची माफी मागा, असेही फडणवीस म्हणाले.