तर राष्ट्रपती राजवट गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशातही लागू करावी लागेल ; ना. पाटील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशातही करावी लागेल असे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

ना. गुलाबराव पाटील आज जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हयाच्या खरीप तयारीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी सवांद साधतांना नारायण राणे यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीला प्रतिउत्तर देतांना बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, नारायण राणे यांचे शिवसेनेचे जुने नाते आहे ते शिवसेनेमुळेच मोठे झाले आणि रस्त्यावरील आले त्यामुळे त्यांचे नाते प्रेमाचे आहेत असा टोला त्यांनी लगावला. कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केले आहे. ह्या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशातील करावी लागेल. मात्र, या काळातही काहीजण राजकारण करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला ना. पाटील यांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून आपत्तीच्या काळात एकत्र येण्याची वेळ असल्याचे मत व्यक्त केले. कोरोना हा काही महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वत्र जगात व देशात हा संसर्ग पसरला आहे. ही आपत्ती आहे तिला सामोरे गेले पाहिजे. काही त्रुटी असतील तर त्याला सामोरे गेले पाहिजे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/252499269329448/

Protected Content