मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. राज्यात भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका ट्वीटद्वारे केली आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. राज्यात भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवणे हा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे.
#महाविकासआघाडी सरकारची सत्ता आहे म्हणून आज मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. @BJP4Maharashtra ची सत्ता असती तर दिल्ली प्रमाणे मुंबई सुध्दा पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचा #भाजपा चा डाव आहे. तो मोडून काढला पाहिजे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 3, 2020