हैदराबाद (वृत्तसंस्था) आम्हाला संचारबंदी किंवा ‘शूट अॅट साईट’चा आदेश द्यायला भाग पाडू नका, असा सज्जड दम तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भरला आहे. हैदराबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. लष्कर बोलावून संचारबंदी लावण्यात येईल, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे. नागरिकांनी लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्यास ‘शूट अॅट साईट’चा आदेश द्यावा लागेल. त्यामुळे अशी परस्थिती उद्भवू देऊ नका, असे चंद्रशेखर राव म्हणाले. सोमवार आणि मंगळवारी लोक ज्याप्रकारे लॉकडाऊन तोडून घराबाहेर पडले त्यावर केसीआर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.