जळगाव, प्रतिनिधी । शहरातील साफसफाईचा मक्तेदार वॉटरग्रेसचे काम थांबवून एस. के. मक्तेदारास यांना देण्यात आला आहे. यासंदर्भात सदस्यांनी महासभेत विविध प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी देखील प्रश्न उपस्थित करत एस. के. मक्तेदारास तात्पुरत्या स्वरूपात ठेका देतांना प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही असा आरोप केला.
तात्पुरत्या स्वरूपात एस. के. मक्तेदार यास मक्ता देतांना प्रशासनाने कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नव्हते किवां माहिती दिली नव्हती. तात्पुरती न राहता ती लांबत आहे. शहरातील स्वच्छता, साफसफाई महत्वाची असल्याने प्रशासनाच्या या कृती विरोधात आम्ही नव्हतो. प्रशासनाकडून जे अपेक्षित होते ते होत नसल्याने सर्वच नगरसेवक नाराज आहेत. सर्वच नगरसेवकांचे म्हणणे आहे की, प्रशासन आम्हाला विश्वासात घेत नाही, प्रशासन आमचे ऐकत नाही असेच चालू प्रशासनाची अशीच कार्यपद्धती राहिली तर लवकरच आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची वेळ येऊ शकते असे ॲड. हाडा यांनी सांगितले. तशी वेळ येऊ नये यासाठी प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत ताबडतोड सुधारणा करावी, पदाधिकारी, सदस्य यांना विश्वासात घ्यावे अशी अपेक्षा ॲड. हाडा यांनी व्यक्त केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1416911368495438/