धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीला काहीतरी आमिष दखवत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, १९ वर्षीय तरुणी ही मध्य प्रदेशातील भोपाल येथे रहिवासी आहे. त्या ठिकाणी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे राहणारा नाना देशमुख याची तरुणीशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर २९ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान संशयित नाना देशमुख याने काहीतरी आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने भोपाळ येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार हा गुन्हा धरणगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.