Home Cities पारोळा तरूणीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

तरूणीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल


पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरूणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सार्वे येथील २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते, गावातील नाना सुकदेव मालचे याने तरूणीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. तर पुनम नाना मालचे हिने मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे. 


Protected Content

Play sound