तरूणाला अश्लिल शिवीगाळ करून मुद्देमाल चोरून नेला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका मिठाईवाला दुकानात दमदाटी करून दुकानावर दगड मारला तसेच अश्लील शिवीगाळ करून तरूणाच्या खिशातील रोकड व ब्लूटूथ हेडफोन चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, विशाल सुनील खिलोसिया (वय 34, रा. शनी मंदिर न्यू प्लॉट अमळनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्य असून त्याचे न्यू जवेरचंद नाथालाल मिठाईवाला या नावाचे दुकान आहे. विशाल हा २४ डिसेंबर रेाजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकानावर असताना संशयित आरोपी तनवीर शेख मुख्तार रा. अमळनेर हा तिथे येऊन काहीही कारण नसतांना  हातात दगड घेवून दुकानावर फिरकावला. यात दुकानातील घड्याळाचे नुकसान झाले आहे. तसेच अश्लील शिवीगाळ करून विशाल खिलोशिया यांच्या खिशातून ४५० रुपयाची रोकड आणि १ हजार २०० रुपये किमतीचे ब्लूटूथ हेडफोन जबरी चोरून नेले आहे. या संदर्भात रविवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तनवीर शेख मुख्तार रा. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.

 

Protected Content