जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू व्यवसायाच्या वादातून निवृत्ती नगरात आव्हाणे येथील भावेश पाटील या तरूणाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना गुरूवार १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनिष नरेंद्र पाटील रा. आव्हाणे ता.जि.जळगाव आणि भूषण रघुनाथ सपकाळे रा. खेडी खुर्द ता.जि.जळगाव असे अटकेतील दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश उत्तम पाटील (वय-३२) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव ह.मु.निवृत्ती नगर,जळगाव हा आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह दोन वर्षांपासून वास्तव्याला होता. भावेश पाटील हा मनिष पाटील आणि भुषण सपकाळे यांच्यासोबत वाळूचा व्यवसाय करत होता. दरम्यान भावेश पाटील याने वाळू व्यावसायात चांगला बस बसविला होता. या रागातून दोघांनी भावेशला मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास निवृत्ती नगरातील बंधन बँकेजवळ बोलावून बेसावधपणे असतांना दोघांनी चॉपरने २४ वार करून भावेशचा निर्घृण खून केला. घटना घडल्यानंतर दोन्ही मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २५ ऑगस्ट रोजी पुण्यातून अटक करण्यात आले. शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरूवार १ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे करीत आहे.