जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.आर. शाळेजवळील गुरूद्वारा येथून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम दिलीप राठोड (वय-२७) रा. गणेश कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शहरातील आर.आर. शाळेजवळील गुरूद्वारा नजीक कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ सीए ६५१९) ने आला. दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेला. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. शुभम परत आल्यावर त्याला जागेवर दुचाकी दिसून आली नाही. अखेर सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ गणेश पाटील करीत आहे.