तरुणीवर अत्याचार करणाऱ्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा

 

पारोळा, प्रतिनिधी। तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांना नायब तहसीदार जे. जे. पाडवी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्यांविरोधातील केस चांगला वकील लावून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. मुलीच्या परिवारास पुरेसे संरक्षण द्यावे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. मुलीच्या परिवाराला मनोधैर्य योजनेअंतर्गत लाभ व संरक्षण मिळावे. जिल्ह्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या महिला संबंधीअसलेला विभाग अधिक कार्यक्षम करावा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीच्या योग्य ट्रॅक ठेवावरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिला. निवेदन देतांना आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव रईस खान पठाण, जिल्ह्याचे संघटनमंत्री उज्वलसिंग पाटील, तसेच संदीप पाटील, किशोर शिवाजी पाटील, दीपक विनोद पाटील, आशुतोष पाटिल, अश्विन कोळी, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content