जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।तालुक्यातील तरसोद येथील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र गणपती देवस्थान धार्मिक ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील, माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील , माजी सभापती पुष्पाताई पाटील, जि .प सदस्य पवन सोनवणे, सरपंच संतोष सावकारे, उपसरपंच निलेश पाटील, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, श्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष सुभाष बरहाटे, सर्व विश्वस्त, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, गजानन पाटील, युवा सेनेचे शिवराज पाटील, माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तुषार महाजन, गिरीश भोळे, तालुका संघटक अजय महाजन, रविंद्र चव्हाण सर, रमेशआप्पा पाटील, नशिराबाद माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, चंदूभोळे, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, राजेंद्र पाटील, निलेश वाघ, डॉ. कमलाकर पाटील, संजय घुगे, रवि कापडणे, नंदलाल देशमुख, गोपाल जिभाऊ, साहेबराव पाटील, ब्रिजलाल पाटील, बापू महाजन, चेतन पोळ, जितू पोळ, श्रीराम पाटील, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता जे. एस. सोनवणे, सा. बा.चे उप अभियंता गिरीश सूर्यवंशी, कॉन्ट्रॅक्टर नानाभाऊ सोनवणे, शर्मा, परिसरातील सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंदिर देवस्थान संस्थान, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील यांनी केले होते.
तालुक्यातील तरसोद येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण करण्यात आले. खास करून याठिकाणी असलेले पेशवे कालीन जागृत श्री गणरायाच्या देवस्थानासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिल्याने व या क्षेत्रास पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा प्राप्त करून दिल्याने देवस्थानावर विकासकामांचा एकप्रकारे धडाकाच सुरू आहे.या देवास्थानचा जगभरात नावलौकीक आहे, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत गणपती मंदीर परिसरात भक्तनिवासाचे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंदिरालगत पुलाच्या बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले. तर पर्यटन विकास योजनेतून गणपती मंदिर परिसरात खुले सभागृह ,स्वच्छतागृह प्रवेशद्वार संरक्षण भिंत पार्किंग व बगीचा सुशोभीकरण करणे यासाठी 4 (कोटी 89 लक्ष), डीपीडीसी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (22 लक्ष), स्मशानभूमी बांधकाम व सुशोबीकरण करणे (१० लक्ष), आमदार निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवणे (5 लक्ष), मूलभूत सुविधा अंतर्गत म्हणजेच २५१५ मधून एलएडी बसविणे (5.50 लक्ष) अशा एकूण 5 कोटी 30 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.
भाविकांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथमत: मंदिरास पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा मिळवून आणला. यानंतर रस्त्यांसह मंदिर विकासासाठी आवश्यक तितका निधी मिळवून दिला. तसेच तरसोद गावात पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लाग, एल.ई.डी. लाईट, स्मशानभुमी, व्यायामशाळा, समाज मंदिर आदींसाठी सुमारे साडेसात कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल मंदिर संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व वि. का. सोसायटी मार्फत ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील,जि. प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले तर पालमंत्री यांनी तरसोद गावासाठी केलेले हे प्रयत्न बघता कितीही आभार मानले तरी कमीच असतील असे मत व्यक्त करत तरसोद ग्रामपंचायत, विकास सोसायटी, गणपती मंदिर संस्थान व ग्रामस्थांमार्फत आयोजक तथा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील यांनी आभार मानले.