मुक्ताईनगर : प्रतिनिधी । घोडसगाव येथे तालुका आरोग्य प्रशासनाने आयोजित केलेल्या कोरोना तपासणी शिबिरात १७० ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ७ जण बाधित आढळून आले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावमध्ये तहसीलदार श्वेता संचेती, वैद्यकीय अधिकारी अमित घडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा तथा गृप ग्रामपंचायत घोडसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी 9 वाजेपासून तपासणीला सुरुवात करण्यात आली 170 गावकऱ्यांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली त्यात 7 रुग्ण कोरोना बाधित आढळले. 12 रुग्णांची आरटीफीसीआर चाचणी करण्यात आली.कोरोना बाधित आलेल्या रुग्णांची तपासणी करून होमकोरोन्टाइन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा, प्रा.आ उपकेंद्र घोडसगाव येथील कर्मचारी तसेच घोडसगावच्या सरपंच सौ.प्रतिभा कोल्हे, ग्रा.पं. सदस्य प्रफुल्ल जवरे, अनिल पटेल, निखिल कपले, ग्रा.पं.सदस्य निलेश दुट्टे, प्रभाकर धायडे, रमेश सुरवाडे, भिकाजी कोल्हे, सोपान दुट्टे, सतीश वाघ, गोलू मुर्हे प्रयोगशाळा प्रमुख डॉ प्रदीप पटेल , आरोग्य सेवक सुरेश ऐशी, पंकज पवार, पोलीस पाटील श्रीराम खोटे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रा.पं. कर्मचारी यांनी सहकार्य केले.
डॉ अमित घडेकर यांनी सर्व जनतेनी रॅपिड टेस्ट करून घ्यावी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1348007035574477