तणाव वाढल्याने पाकिस्तानात सोशल मीडियावर बंदी

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । तणाव वाढल्याने पाकिस्तान सरकारने संपूर्ण देशात सर्व सोशल मीडिया अ‌ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घातली.  शुक्रवारी फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, टेलिग्राम आदी सगळं काही बंद करण्यात आले आहे.

 

पाकिस्तानी गृहमंत्रालयाने तसे आदेश काढले आहेत. मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने सर्व समाजमाध्यमं बंद केली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला.

 

 

तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या धार्मिक संघटनेच्या लोकांमध्ये फ्रान्सबदद्ल रोष आहे. याच रोषापोटी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून प्रकाशित केल्यामुळे हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून फ्रान्सच्या राजदुतांनीसुद्धा पाकिस्तान सोडून जावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. हे आंदोलन संपूर्ण पाकिस्तानमध्ये पसरले आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तानमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.

 

 

पाकिस्तानी लोकांमध्ये फ्रान्सबद्दल रोष आहे. वेगवेगळ्या धार्मिक संघटना फ्रान्सविरुद्ध आंदोनल करत आहेत. यामध्ये तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा मुख्य सहभाग आहे. या संघटनेवर पाकिस्तामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. मुळात फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून बनवल्यामुळे पाकिस्तानमध्ये फ्रान्सविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून नागरिकांचा फ्रान्सविरोधातील रोष कायम असून अजूनही येथे आंदोलन सुरुच आहे.

Protected Content