रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! रावेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाल गावातील आऊट पोस्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पाल येथील डोंगर जय पॅलेस ढाब्यावर मजूर म्हणून काम करत होता त्याच्या कुटुंबात आई आणि वडील आहेत आणि सूरज नावाचा त्याचा मेहुणा देखील या ढाब्यावर काम करतो.
या प्रकरणाची माहिती अशी की, बुरहानपूर जिल्ह्यातील धुळकोटबोरी गावातील रहिवासी १९ वर्षीय मुकेश सुकलाल सोलंकी याने शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता १० वाजता पालगाव पोलीस स्टेशन हड्डीच्या शेरीनाका परिसरात झाडाला गळफास लावून घेतला. मात्र त्याचा मृतदेह लटकलेला पाहिल्यावर गावातील नागरिकांना पोलिसांना माहिती दिली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पाल पोलीस ठाण्याचे पीएसआय विशाल सोनवणे यांचे सहकारी काँसटेबल ठाकूर,उमेश नरवाडे,अमोडकर हे लागलीच घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी फास कापून मृतदेह खाली उतरविले पंचनामा केला. मुकेश हा या धाब्यावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता, सुमारे महिनाभरापूर्वी तो पाल गावातील डोंगर जय पॅलेस ढाब्यावर रात्री काम करायचा. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रावेर ग्रामीण रुग्णालय रावेर येथे आणले. परिस्थिती पाहता ते त्याने आत्महत्येचे पाऊल कसे उचलले असावे याचा अंदाज नाही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल.