यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने विवाह झालेल्या गावातील मुलींना माहेरची साडी व मुलींना जन्म देणाऱ्या सुनबाईस १ हजार १०० सप्रेम भेट म्हणुन देण्यात येणार आहे.
डोणगाव तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या सरपंच आशाबाई सुरेश पाटील, उपसरपंच मनोहर पांडुरंग भालेराव, सदस्य शांताराम अरुण पाटील, सूर्यभान निंबा पाटील, माधुरीताई विलास कोळी, सरलाबाई बाबुराव पाटील, भावना समाधान ठोके यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातुन एक अनोखा उपक्रम गावात राबवण्यास सुरुवात केली आहे. दिनांक.१ जानेवारी २०२३या नव वर्षा पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाचे परिसरासह संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.
आपल्या गावातील लाडकी मुलगी लग्न करून सासरला जातांना ग्रामपंचायत डोणगाव कडून माहेरची भेट म्हणून ११०० रुपयांची पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या मुलीला आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत. ती मुलगी आपल्या गावातील रहिवासी असली पाहीजे व लग्न होण्याच्या १० किंवा १५ दिवसाआधी ग्रामपंचायत कार्यालयात लग्नपत्रिका देऊन लग्नाची माहीती कळविण्याची जबाबदारी परिवाराची राहील. सरपंच ग्रामलक्ष्मी योजना या योजनेचे महत्त्व आपल्या गावातील मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढवण्याचे उद्देशाने आपल्या गावातील सुनबाईने मुलीला जन्म दिलास ग्रामपंचायत डोणगावकडून ११०० रुपये प्रोत्साहन पर रक्कम भेट दिली जाईल.
ग्रामपंचायतीने लागू केलेल्या या सर्व योजना १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहेत तसेच ग्रामपंचायत कराचा भरणा वेळेवर करा व गावाच्या विकासाला सहकार्य करा असे हे आवाहनही यावेळी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेले आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम परिसरात चर्चेचा विषय झाला आहे काही उपक्रम कुटुंबाचा आधार महिला व समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेली महिला आणि या घटकासाठी व आपल्या कुटुंबात जन्म घेणारी कन्या यांना समोर ठेवून हा प्रयत्न डोणगाव ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे. व या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ग्रामपंचायत डोणगावचे सरपंच सर्व सदस्यांनी केले आहे.