डोंगरकठोरा येथे विद्यार्थीनीने वाढदिवसानिमित्त मास्क वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा येथील कुमारी हर्षाली भागवत कोळी हिने आपल्या वाढदिवसानिमित्ताने डोंगरपाडा या आदिवासी वस्तीमध्ये जाऊन स्वतः ५० मास्क बनवून आदिवासी बांधवांना वाटप केले.

आदीवासी बांधवांना कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून दिली. कोरोनापासून कसा बचाव करावा व काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती देण्यात आली. बाहेरून घरात आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, पुनम चंद्रकांत ठोंबरे हिने आदिवासी बांधवांना कोरोनाबाबत पोस्टद्वारे माहिती दिली.

 

कार्यक्रमाला भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रचे कर्मचारी आरोग्यसेविका बी.जी. रामावत, लता चौधरी, आरोग्यसेवक चेतन कुरकुरे, आशा वर्कर, मालती आढाळे उपस्थित होते. कार्यक्रम एनएसएस महिला कॉलेज, कला वाणिज्य डोंगरकठोरा आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला. अशोक तायडे यांनी कोरोना संबंधी माहिती व मार्गदर्शन करून मास्कचे वाटप केले. यावेळी जितुपावरा, जामसिंग पावरा, नरसिंग पावरा, बानू बारेला, सुरेश बारेला, रायसिंग बारेला, रामा पावरा, अरुण कदम, गोवर्धन कदम, सुमन भिलाला, भद्री बिलाला, हमजा पावरा, नर्सिंग भिलाला आदी आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाला सूत्रसंचालन लता चौधरी यांनी केले तर आभार चेतन कुरकुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक तायडे, पूनम ठोंबरे, हर्षाली कोळी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content