यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील शेतात एका तरूण शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदीप विजय भंगाळे (वय-३७) रा. सांगवी बु ता. यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.
संदर्भात मिळालेली माहिती अशी की, प्रदीप भंगाळे हा डोंगरकठोरा शिवारातील चेतन प्रकाश पाटील यांच्या शेतात राहुन शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २८ जुलै रेाजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे सोबत कामास असलेले वडील विजय भंगाळे हे त्यास भेटुन घराकडे निघाले होते. याच दरम्यान प्रदीपने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या मजूराच्या लक्षात आल्याने उघडकीला आले. मुलाने गळफास घेतल्याची माहिती समजताच विजय भंगाळे यांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवून तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयताचे वडील विजय भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.