Home आरोग्य डॉ . मयुर पाटील एमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

डॉ . मयुर पाटील एमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण


 

 

  यावल  :  प्रतिनिधी । चोपडा  तालुक्यातील पारगाव येथील  रहिवाशी  डॉ.मयुर राजेश पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन ( मुंबई  ) येथून एमबीबीएस पदवीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

डॉ .मयुर पाटील हे पारगाव   येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश पाटील यांचे चिरंजीव असून विरावली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड .देवकांत पाटील  ( यावल ) यांचे चुलतबंधू आहेत. डॉ .मयुर पाटील हे एमबीबीएस   परिश्रेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अरुणभाई गुजराती यांनी त्याचे अभिनंदन केले   एकनाथ पाटील ,योगेश सनेर , राजेंद्र साळुंखे, व विरावली गावातील मान्यवरांनी  त्यांना  भावी वाटचालीस शुभेच्छा  दिल्या  आहेत .

 


Protected Content

Play sound