डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा डिजिटलमाध्यमातून साजरी करा : अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरीच आणि डिजिटलमाध्यमातून साजरी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच राज्यातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. घरी राहून जयंती साजरी करताना बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व करोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असे अजित पवार म्हणाले. करोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असेही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Protected Content