Home Cities जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील अतिक्रमण जमीनदोस्त (व्हिडिओ)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील अतिक्रमण जमीनदोस्त (व्हिडिओ)

0
34


 

जळगाव, प्रतिनिधी । खाॅव्जामिया दर्ग्या शेजारील महापालिका मालकीच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बेकायदेशीर शेड उभारण्यात आली होती. हे नियमबाह्य बेकायदेशीर पत्रे अतिक्रमण पथकाद्वारे आज सायंकाळी काढण्यात आले. 

महापालिका मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या खुल्या जागेत विना परवानगीने  कॅफे उभारण्यात आला होता. हा कॅफे काढून घेण्याच्या मनपा प्रशासनाने सूचना देऊन देखील काढण्यात आला नसल्याने आज अतिक्रमण विभागाच्या पथकाद्वारे जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले. उद्यानातील लाॅनला कॅफे चालकाकडून बेकायदेशीरपणे कंपाऊंड करण्यात आले होते.  हे सर्व अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त पवन पाटील,  अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख व अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. 

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/181419476652019

 


Protected Content

Play sound