Home आरोग्य डॉ. चक्रधर पाटील यांची घरोघरी जाऊन रूग्ण तपासणी

डॉ. चक्रधर पाटील यांची घरोघरी जाऊन रूग्ण तपासणी

0
26

चोपडा प्रतिनिधी । एकीकडे खासगी डॉक्टर्स रूग्णांवर उपचार करण्यास पुढेमागे पाहत असतांना तालुक्यातील हातेड खुर्द येथील डॉ. चक्रधर पाटील यांनी हातेड खुर्द येथे घरोघरी रूग्ण तपासणी केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे.

सध्या कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यातच अनेक खासगी डॉक्टर्सनी रूग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, हातेड खुर्द येथील डॉ. चक्रधर पाटील यांनी गावातील घराघरात जाऊन ग्रामस्थांची तपासणी करून घेतली आहे. त्यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांना जनजागृतीपर माहिती दिली. गावाचे सरपंच ज्ञानेश्‍वर कोळी, पोलीस पाटील सुनील सोनवणे, उपसरपंच अनिल सोनवणे आदींसह ग्रामस्थांनी डॉ. चक्रधर पाटील यांचे कौतुक केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound