शेंदुर्णी, प्रतिनिधी । पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व शेंदूरणीचे सुपुत्र डॉ. सागर गरुड यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांनी आगळा वेगळा संकल्प केला असून दि. ३० एप्रिलपासून दररोज शेंदूर्णीतील २०० गरीब गरजवंताना चक्राकार पद्धतीने महिनाभर तयार भोजनाचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे.
शेंदुर्णी येथील सिद्धार्थ लुनिया व डॉ. सागर गरुड मित्र परिवाराच्यावतीने शेंदुर्णीतील गोर गरिबांसाठी दररोज संध्याकाळी घरपोच भोजनाची डब्यातुन ,पार्सलद्वारे व्यवस्था करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. आजपर्यंत ६०० गरीबांना भोजन पुरविण्यात आले आहे. डॉ. सागर गरुड यांनी वाढदिवस साजरा न करता मित्र परिवाराकडून जाहिराती बॅनर, यावर होणारा खर्च टाळून गरिबांना घास भरविल्यामुळे डॉ. सागर गरुड व सिद्धार्थ लुनिया मित्र परिवाराला निराधार, गोरगरीबांचे आशीर्वाद मिळत आहे. दररोज, संध्याकाळी गोरगरीब, निराधार यांच्या घरी जाऊन त्यांना भोजन पुरविले जात आहे. त्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच गोराडखेडा ता.पाचोरा येथे वाढदिवसानिमित्ताने डॉ.सागर गरुड यांनी १ लिटर वजनाचे २०० फॉर्च्युन सोयाबीन तेलाचे पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे. विनाकारण बाहेर पडु नये, सॅनिटायझर मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात धुवावे, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ. गरुड यांनी केले आहे.