यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातोद येथे नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे विकासोचे सभासद डॉ. कुंदन फेगडे यांनी पुष्यगुच्छ देऊन सत्कार केला
सातोद विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सतीश पाटील तर व्हाईस चेअरमनपदी केशव तळेले यांची बिनविरोध निवड होऊन सलग ३ वेळा या पॅनल चे वर्चस्व हे कायम ठेवले आहे. यांच्यासह संचालक मंडळाचे डॉ. कुंदन फेगडे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुधाकर फेगडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील , माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश पाटील, व्हाईस चेअरमन केशव तळेले,सदस्य अशोक पाटील, सतीश फेगडे, रुपचंद तळेले , रवींद्र महाजन, केदार धांडे, त्र्यंबक तळेले, लीलाबाई तळेले, युगंधराबाई पाटील, सचिव अंबादास मराठे, खत विभाग कर्मचारी लीलाधर धांडे, धान्य विभाग कर्मचारी भरत फेगडे आदींची उपस्थिती होती.