डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात ३५० हून अधिक जणांची तपासणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कानदुखी, गुडघेदुखी, पोटदुखी, डोळ्यांनी अंधुक दिसणे याशिवाय मधुमेह, उच्चरक्‍तदाबाने त्रस्त असलेल्या ३५० हून अधिक रुग्णांची बुधवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

 

रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा हे ब्रिद जोपासत गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय हे अविरतपणे आलेल्या प्रत्येक रुग्णाला स्विकारत त्याच्यावर यशस्वी उपचार करत आहे. एकाच छताखाली विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर्स, रुग्णालयातच प्रयोगशाळा, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, सोनोग्राफी ही सर्व सुविधा असल्याने रुग्णांना उपचार घेणे सोयीचे होत आहे. जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जवळील खेड्यापाड्यातून रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहे. आज दिवसभरात ३५० हून अधिक रुग्णांनी डॉक्टरांची भेट घेऊन होणार्‍या त्रासाबद्दलची माहिती दिली आणि डॉक्टरांनी रुग्णांच्या शंकाचे निरसन केले.
चाचण्याअंती रुग्णांना केले दाखल
रुग्णालयात एकूण १२ विभाग असून त्यापैकी मेडिसीन, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, शस्त्रक्रिया, स्त्रिरोग, बालरोग या विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या ओपीडीला रुग्णांची गर्दी झाली होती. ओपीडीत तज्ञांनी काही रुग्णांना औषधोपचार लिहून देत तर काहींच्या रक्‍त, लघवीसह गरजेनुसार सोनोग्राफी, सीटी, एमआरआय, एक्स रे अशा चाचण्या करुन घेण्यात आल्या आणि त्यापैकी २४० रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले.
उद्यापासून शस्त्रक्रियांना होणार सुरुवात
बहुतांश शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि मध्यप्रदेश वासियांसाठी आयुषमान भारत ह्या योजनेंतर्गत होत असल्याने त्यात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांच्या आवश्यक त्या तपासण्या झाल्यानंतर उद्या सकाळपासून शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे.
या होणार शस्त्रक्रिया
प्रोस्टेट, हर्निया, हायड्रोसिल, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, अंडाशयाच्या गाठी, लहान शिशूंवरील शस्त्रक्रिया, सांधेरोपण, कानाचे सडलेले हाड, नासूर, मोतिबिंदू अशा विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तसेच मेडिसीन विभागांतर्गत लिवर सिरॉसिस, स्ट्रोक, क्रोनिक किडनी डिसीज, मधुमेह, उच्च रक्‍तदाब आदि विकारांचे रुग्णांवर उपचार सुरु झाले आहे.
मोफत एन्डोस्कोपी तर सवलतीत एमआरआयची सुविधा
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नाक आणि घशाची मोफत एन्डोस्कोपी केली जाते. यात आवाजात बदल, आवाज बारीक होणे, जेवण, पाणी गिळण्यास त्रास, नाक बंद पडणे, नाकातून वारंवार रक्‍तस्त्राव होणे आदि समस्या जाणवत असल्यास आजच रुग्णालयाशी संपर्क साधा आणि तज्ञांच्या सल्ल्याने मोफत एन्डोस्कोपीचा लाभ घ्यावा तसेच सवलतीच्या दरात येथे एमआरआयचीही सुविधा असल्याने रुग्णांना चाचण्यांसाठी रुग्णालय बाहेर जाण्याची आवश्यकता राहत नाही.
दरम्यान, डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात विभागनिहाय शस्त्रक्रिया – ५०,मेडिसीन – २५,अस्थिरोग – ३०,,कान-नाक-घसा – २४,नेत्ररोग – २९, सर्जिकल आयसीयू – ५, मेडिसीन आयसीयू – १८, स्त्रिरोग – २७, पीआयसीयू – ४, एनआयसीयू – १२, सीआयसीयू – ११, मानसोपचार – ५ रुग्णांची भरती करण्या आली आहे.

Protected Content