डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे इंटरकॉलेज जीसीएल स्पर्धा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे इंटरकॉलेजेस जीसीएल २०२३ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्यात.

 

२८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत या स्पर्धा झाल्यात, यात मुलांच्या ३२ तर मुलींच्या ७ संघानी सहभाग नोंदविला होता. रविवार २ एप्रिल रोजी इंटरकॉलेजेस जीसीएल स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम पारितोषीक डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने तर द्वितीय पारितोषिक जळगाव गव्हमेंट मेडिकल कॉलेजने व तृतीय पारितोषिक संभाजीनगर मेडिकल कॉलेजने पटकाविले. तसेच मुलींमध्ये सीपी सर्जिकल स्ट्रायकर्सने प्रथम, अधिरथ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने द्वितीय पारितोषिक पटकाविले. प्रथम पारितोषिक ३३००० व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.

 

 

मॅन ऑफ द मॅच फायनलमध्ये डॉ.दिशांत पाटील(टिम डीयूपीएमसी), मॅन ऑफ द सिरीज अ‍ॅण्ड बेस्ट बेट्समन वेदभुषण खारोडे (जीएमसी नांदेड), बेस्ट बॉलर क्रिष्णा धगे (जीएमसी जळगाव), मुलींमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज गायत्री सोनटक्के (सर्जिकल स्ट्रायकर्स). आयोजन समितीत डॉ.दिशांत पाटील, डॉ.किशोर कदम, डॉ.पंकज राजपूत, डॉ.योगेश खुरपे, यश महाजन, शैलेश शेटे यांचा समावेश होता. इंटरकॉलेजेस जीसीएल स्पर्धेतील विजेत्यांचे गोदावरी फाऊंडेनशचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डॉ.विठ्ठल शिंदे, क्रिडा संचालक प्रा.सुरेंद गावंडे व सहाय्यक क्रिडा संचालक प्रा.रितेश तायडे यांनी अभिनंदन केले.

Protected Content